बांधकाम कामगारांना १२ हजार निवृत्ती वेतन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

Khozmaster
2 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बांधकाम कामगारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता वर्षाला १२ हजार निवृत्ती वेतन मिळणार आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येईल.कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती ना. आकाश फुंडकर यांनी सभागृहात दिली. सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कामगार मंत्री फुंडकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यभरातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊनच मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये एवढे निवृत्ती वेतन देण्यात येईल, असे आकाश फुंडकर म्हणाले. मंडळाकडे नोंदणी करून ज्या कामगारांना वीस वर्षे झाली आहेत, त्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. मंडळाकडे नोंदणी करून दहा वर्षे आणि वयाची ६० वर्षे अशांना ६ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात बेईल नोंदणी करून ज्या कामगारांना पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत अशांना वार्षिक ९ हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे, असेही फुंडकर यांनी स्पष्ट केले.मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभमिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इमारत आणि इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने १९९६ मध्ये कायदा लागू केला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने ही कामगारांसाठी २००७ मध्ये नियम बनवले आहेत. २०११ मध्ये महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होते. या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महामंडळाच्या वतीने विविध लाभ देण्यात येतात.

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *