पाणीप्रश्नी हयगय करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

देउळगावराजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. शासनाने पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्ची केले. मात्र या नळ योजना केवळ कागदावर आहेत. अनेक ठिकाणी नळ योजनांना भ्रष्टाचाराची किनार लागली आहे. पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासंह ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा पंचायत समितीच्या वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्यात दिला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, नगर परिषदेचे प्रशासक अरुण मोकळ, ठाणेदार संतोष महल्ले, तालुका कृषी अधिकारी भगवान कचवे, तालुका आरोग्य अधिकारी किशोर गीते, जलसंधार अधिकारी देविदास केंदळे, आरोग्य अधिकारी शिवानंद शिंगाडे, गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, उपविभागीय ना तहसीलदार सायली जाधव, अभियंता नितीन डोईफोडे, अभियंता अमोल इंगळे, वनाधिकारी उमेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, भगवान मुंडे, अनिल चित्ते, सदाशिव मुंढे, गजानन काकड, गणेश डोईफोडे भगवान नागरे, प्रकाश गीते, दीपक चेके, त्र्यंबक चित्ते, खंडू मांटे, शेख नाजीम उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. मनोज कायंदे म्हणाले, वार्षिक आमसभा म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देणारी सभा. प्रत्येक प्रश्नाला या सभेत न्याय मिळाला पाहिजे. या आमसभेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने चुकीची माहिती व अहवाल सादर करण्यात आला. अनेकांनी कामे अपूर्ण असताना पूर्ण दाखविली. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे उत्तर देण्याची नामुष्की ओढवली. आमसभेत ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन, कृषी, रोजगार हमी योजना, शिक्षण, बांधकाम, पाणीटंचाई, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, सामाजिक अन्य विभागाच्या संदर्भात अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी नागरे यांनी चुकीची माहिती या सभेत दिली असता बायगाव येथील गणेश नागरे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. अनेक गावात महिला सरपंच असताना आमसभेत नेहमीप्रमाणे त्यांचे पतीच दिसून आले. महत्त्वाचे आमसभा असताना अनेक अधिकारी, कर्मचारीदेखील गैरहजर दिसून आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहोरे यांनी केले. सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले. ज्या ग्रामपंचायतला विविध पुरस्कार मिळाले, तेथील सरपंच, सचिव व आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *