उपोषणाचा इशारा देताच मंडळ अधिकारी, तलाठी नरमले तीन दिवसांत फेरफार रुजू : ३२ प्लॉटधारकांना मिळाला सातबारा

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

नायब तहसीलदारांच्या आदेशाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने संबंधित ३२ प्लॉटधारकांना पंधरा दिवसांत सातबारा न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर भूखंडधारकांसह शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी उपोषणाचा इशारा दिला. या इशाऱ्याची धास्ती घेत २६ मार्च रोजी तिसऱ्याच दिवशी फेरफार रुजू करून मंडळ अधिकारी सिंधू झिने, तलाठी शीतल गावंडे यांनी ३२ प्लॉटधारकांना सातबारा उतारा दिला.दाताळा येथील गट नंबर ९६१ मधील अशपाकखाँ रहीम उल्लाखाँ, जगन्नाथ ढवळे, लता बढे, एकनाथ तायडे, सुरेश चोपडे, माधव तायडे, सुपडा सोनोने, बळीराम खर्चे, रवींद्र तायडे, दामोदर रामा वराडे, माधव तायडे, रमेश बढे, दिनकर जोशी, गजानन जोशी, ओंकार चौधरी, हरिभाऊ देशमुख, अर्चना राजपूत, शंकर नारखेडे, जनार्दन देशमुख, श्रीराम नाफडे, शंकर चौधरी, किशोर चौधरी, योगेंद्र महाजन, इंदुबाई महाजन, संगीता चौधरी, विलास खर्चे, वासुदेव नाफडे, सिंधू नाफडे, नैनेश राजपूत, भास्कर तायडे, संतोष पाटील, सुपडा सोनोने, बन्सीलाल धूत यांच्या नावाने सातबारा दक्ता क्रमांक १ मधील खातेदाराच्या नावासमोर रकाना क्रमांक ४ नुसार क्षेत्रफळाची नोंद घेण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार आज सर्व ३२ प्लॉटधारकांना दाताळा येथील तलाठी कार्यालयात बोलावून तलाठी शीतल गावंडे यांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांच्या उपस्थितीत ३२ प्लॉटधारकांना सातबारा उतारा दिला.

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *