सर्वधर्मसमभावाचे प्रतिक ठरतेय महादेव मंदिर व मशिदीची भिंत

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव मही:-विशेष प्रतिनिधी 

देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या देऊळगाव मही गावातील महादेव मंदिर व मशिदीची भिंत एकच असलेले उदाहरण या गावात राहणाऱ्या विविध समाज बांधवांच्या एकोपा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. येथील लोक एकमेकांच्या धर्म व विश्वासाला आदर देऊन सर्वधर्मसमभावाच्या मार्गावर एकत्र वाटचाल करताना भाईचारा व एकजूट वाढविण्याचा संकल्प करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.देऊळगाव मही गावातील विविध धर्मातील लोक एकमेकांच्या सन्मानात व सलोख्यात राहून, आपापसात प्रेम, शांतता आणि समरसतेने वागविण्याचे उदाहरण देत आहेत. यामुळे समाजामध्ये एकता, भाईचारा आणि एकजूट वाढत आहे. इस्लाम धर्मात पवित्र ‘रमजान’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. या पवित्र रमजान महिन्यामध्ये मोठा उपवास म्हणजे २६ वा रोजा हा ‘लैलातुल कद्र’ किंवा शक्तीची रात्र म्हणून ओळखला जातो. या निमित्त देऊळगाव मही नगरीतील एक सर्व समावेशक नेतृत्व, सर्व जाती धर्मातील सण उत्सव कार्यात सहभाग असणारे छत्रपती अर्बनचे अध्यक्ष तथा कृउबास सभापती समाधान शिंगणे यांनी अन्नाचं एक कण अथवा पाणी न पिता अतिशय कठीण असा १४ तास उपाशी राहून रोजा ठेवला, रमजान महिन्यातील २६ वा उपवास हा महत्वाचा रोजा ठेवत शिंगणे यांनी हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश दिला आहे.यावेळी जिल्हा परिषद बुलढाणा मा.अर्थ व बांधकाम सभापती रियाज पठाण, कृउबा समिती मा. संचालक मन्नान पठाण, हन्नान पठाण सर, इजास पठाण, आशिक मोहम्मद, अफरोज पठाण, जहीर खान, गजन्फर खान, उस्मान कुरेशी, शेख ताहेर से वाहेद यांच्या सह इत्तर मुस्लीम बांधव उपस्थित होते.

0 9 5 4 3 4
Users Today : 160
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *