मोताळा:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन हद्दीतील थड परिसरात बांधकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे अमिष दाखवित सहा जणांना एकाला २५ लाखाने गंडविल्याचा धक्कादायक प्रकार २७ मार्च रोजी उघडकीस आला. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी सहा जणाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भराडी (जि. जळगाव) येथील आनंदा नारायण जंजाळ व त्यांच्या दोन मित्रांना अज्ञात आरोपींनी खोदकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करीत २५ लाखांमध्ये एक किलो सोने देण्याचा सौदा झाला होता. मोताळा तालुक्यातील थड परिसरात सदर व्यवहार होणार होता. मात्र, यावेळी सोने असलेली गाडी पोलिसांनी पकडल्याचा आरोपींनी बनाव करीत वेळ मारली. यासाठी त्यांनी तीन ते चार नकली पोलीस देखील बनविले होते. सोने न देता पंचवीस लाख रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केल्याची घटना २२ मार्चच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, ात आरोपींनी खोदकामात अज्ञात सापडलेले सोने कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून पंचवीस लाखांनी फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा जंजाळ यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिली. सदर फिर्यादीवरुन धामणगाव बढे पोलिसांनी सहा आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यचा पुढीत तपास धामणगाव बढे ठाणेदार नागेश जायले हे करीआरोपींना पकडण्याचे आव्हान या प्रकरणात पोलिसांनी अजय प्रभाकर नाईक पाटील (रा. जामनेर आनंदनगर जि. जळगाव), गोविंदा काशीराम रोकडे (रा. लावखेड ता. पातूर जि. अकोला) व इतर ४ अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी फरार होण्यात होण्यात यशस्वी झाले असून त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान धामणगाव बढे पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे धामणगाव बढे पोलीस हे आव्हान पेलतील का?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत आहेत.
Users Today : 160