नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
निमगाव फाट्यालगत असलेल्या पाईप फॅक्टरीसमोर हुंडाई युवानचा अपघात होऊन अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ मार्चच्या सकाळी ७ वाजता घडली.
विष्णू येलू घाईट (रा. बालाजीनगर वार्ड नंबर २) यांनी नांदुरा पोलिसांना माहिती दिली की, त्यांचा चुलत भाऊ पुरुषोत्तम निवृत्ती घाईट (वय ४० वर्ष) रा. बाबावाडी (नांदुरा) यांचा निमगाव फाट्याजवळील पाईप फॅक्टरी जवळ अपघात झाला. त्यानुसार ते अपघात स्थळी गेले असता हुंडाई युवान चारचाकी गाडी रोडच्या उजव्या बाजूला पलटी झालेली होती.त्यावेळी चालक पुरुषोत्तम निवृत्ती घाईट हे जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र (नांदुरा) येथे उपचारासाठी भरती केले. मात्र, उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी मृतकचालक पुरुषोत्तम निवृत्ती घाईट याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार इंगळे हे करीत आहेत.
Users Today : 160