शेगाव:-विशेष प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांना टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेगाव शहरातील मुरारका हायस्कूल जवळील वळणावर आज २८ मार्च रोजी हा अपघात घडला.दीपक सलामपुरिया यांची बाळापुर रोड वर मुरारका हायस्कूल जवळ दुकान दूध डेयरी आहे. आज २८ मार्चच्या दुपारी एक वाजेच्या सुमारास ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले होते. लघवी करुन परत येत असताना रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना लगेच स्थानिक सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
Users Today : 160