चिखली:-तालुका प्रतिनिधी
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार, विकासकन्या श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त २७ मार्च २०२५ रोजी चिखली शहरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे संयोजन भाजपाचे जिल्हा सचिव दीपक काळे व त्यांच्या मित्रमंडळाने केले होते. या कार्यक्रमांना चिखली शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी चिखली शहरातील आराध्य दैवत आई रेणुका माता मंदिरात देवीला पातळ अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाआरतीनंतर भक्तगणांनी उत्साहात देवीची पूजा केली. त्यानंतर सिद्धार्थनगर येथे बुद्ध प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये खीरदान वाटप करण्यात आले. हा उपक्रम धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला. त्यानंतर स्थानिक शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाने रुग्णांना चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि आयोजकांनी समाजसेवेचा आदर्श प्रस्तुत केला. यानंतर डीपी रोडवरील जिनिंग गेटसमोर शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खिचडी वाटप करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदिच्छा व्यक्त केली. विकासकार्याच्या गाण्यांवरील नृत्याने भरला उत्साह
या कार्यक्रमांमध्ये तरुणांनी श्वेताताई महाले यांच्या विकासकार्यांवर आधारित गाण्यांवर नृत्य सादर करून संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून टाकले. शहरभरातील विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आनंद व सकारात्मकता निर्माण झाली होती. या कार्यक्रमांना उपस्थित राहून यशस्वी करणाऱ्यामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव दीपक काळे सह मित्र मंडळाने सहभाग घेतला. अशा विविध उपक्रमांनी चिखली शहरात आनंदाचा व उत्साहाचा माहोल निर्माण केला. विविध स्तरातील नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला.
Users Today : 160