खामगाव:-तालुका प्रतिनिधी
येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही मागील सात ते आठ महिन्यापासून बंद पडलेली आहे. परंतु आरोग्य विभागाने याबाबत अद्याप कोणतीच ठोस पावले न उचलल्याने आरोग्य प्रशासन गोरगरिबाच्या आरोग्या करिता किती उदासीन आहे हे यावरून सिद्ध होते.जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, आणि खामगाव या परिसरातील सामान्य गोरगरीब रुग्ण सिटीस्कॅन करिता खामगाव येथेच जातात. परंतु खामगाव सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने गोरगरिबांना पुढील उपचाराकरिता अकोला जावे लागते किंवा परिस्थिती नसताना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ यामुळे रुग्णांवर आली आहे. तर पाठपुराव्यानंतर येत्या दोन दिवसात सिटीस्कॅन मशीन सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी बोलताना दिली आहे.
Users Today : 160