मेहकर:-तालुका प्रतिनिधी
दिल्ली येथे सरपंच सेवा महासंघाची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस राज्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित राज्याचे उपाध्यक्ष अरविंद दळवी यांचा सत्कार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार बळवंतराव वानखडे, सरपंच महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, सरपंच महासंघाचे संपर्कप्रमुख अमद मुजावर, मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष कृष्णा गावंडे, विदर्भ संपर्कप्रमुख कुशल घोगरे, विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ग्राम विकास या विषयावर सरपंचांना मार्गदर्शन केले तसेच गाव स्तरावर सरपंचांचे विकास कार्यात येत असलेले योगदान व त्यांना येत असलेल्या अडचणी बाबत संसदेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रामुख्याने खा. भाऊसाहेब वाघचौरे, खा. निलेश लंके, पुरुषोत्तम घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीत सरपंच मानधन, सरपंच संरक्षण कायदा लागू करावा, सरपंचांना विश्रांतीसाठी विश्रामगृह आरक्षित करावे, विधान परिषदेवर सरपंच आमदार नियुक्त करावा, महाराष्ट्र राज्यातील घरकुलाकरिता अडीच लाख रुपये निधी वितरित करावा अशा अनेक मागण्यांसह दिल्ली येथील संसदेमध्ये सरपंच सेवा महासंघाच्या माध्यमातून या सर्व मागण्या मांडण्यात आल्या. बैठकीला सरपंच संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 160