दाताळा:-विशेष प्रतिनिधी
दाताळा पासून जवळच असलेल्या माळेगाव येथे संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची आज २७ मार्च रोजी उत्साहात सांगता करण्यात आली.
धर्माळ संस्थानच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात २० मार्चपासून प्रारंभ झालेल्या रामायण कथेला हभप संतोष महाराज टिकार शेगावकर यांच्या सुमधुर वाणीतून प्रारंभ झाला होता. माळेगाव, चिंचखेड, वडजी, चिंचखेड, प्रगणे दहिगाव, हरणखेड, वडजी, नागेश्वर हरण खेडे, निपाणा येथील समस्त भजनी मंडळी, टाळकरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी कथेत सहभागी होऊन या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वप्रथम हभप विजय महाराज भंगाळे (माळेगावकर) हभप प्रल्हाद महाराज, हभप गजानन महाराज, हभप समाधान महाराज, हभप हेमंत महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप परमेश्वर महाराज व हभप अतुल महाराज या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. २६ मार्च रोजी माळेगाव येथील महिलांनी दिंडी मार्ग परिक्रमा असणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सुशोभित अशा रांगोळ्या काढून रस्त्यावर फुलांची उधळण केल. आज २७ मार्च रोजी हभप संतोष महाराज टिकार (शेगावकर) यांच्या काल्याचे किर्तनाने तसेच महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.
Users Today : 160