नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
मोमिनाबाद येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांन अनुदान देण्यासाठी अनुदान लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी तत्काळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मोमिनाबाद येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदानाची यादी तयार करण्यासाठी कृषी सहाय्यकाची नियुक्ती केली होती. परंतु, कृषी सहाय्याकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे ती यादी अद्यापही तयार झालेली नाही. तरी यादी तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून यादी तत्काळ तयार करण्याची मागणी मोमीनाबादच्या सरपंच आशा भानुदास कदम यांनी २७ मार्चला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना भाजपा विधानसभा प्रमुख शैलेश मिरगे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रमण काळे, भाजपा सर्कल प्रमुख विनोद भोजने, रवी खंडारे, भानुदास कदम, महेंद्र गवळी, अक्षय बाठे आदींची उपस्थिती होती.
Users Today : 160