वर्दडी बुद्रूक:-तालुका प्रतिनिधी
कोणतेही शुभ काम करतांना किंवा कामाचा शुभारंभ करतांना जीवनात यशस्वी होण्यासाठी देवाचे नाव घेऊन त्या कामाचा शुभारंभ करा, असे प्रतिपादन हभप दत्तात्रय महाराज माळवंडीकर यांनी केले.सोमपुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम किर्तनातून ते बोलत होते. आरंभी आवडी आदरें आलें नाम। तेणें सकळ सिध्दि जगीं जालें पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा तूं माय माउली जिवीं जिव्हाळा तुझियेनि नामें सकळ संदेहो फिटला बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाद्वारे उपदेश करतांना महाराज पुढे म्हणाले की, संपत्तीचा कधीही गर्व करू नका. संपत्ती ही दुपारच्या सावली प्रमाणे असते. पुस्तक वाचल्याने मस्तक ठिकाणावर येते, म्हणून नेहमी वर्तमानपत्र, साहित्य कादंबरी किंवा आपल्या आवडीची पुस्तके वाचली पाहिजे, असेही महाराज म्हणाले. यावेळी किर्तनाला गायनसाथ भजन सम्राट पांडुरंग गोळेगावकर, बळीराम महाराज गव्हाड, अनिल महाराज जाधव मृदंग विशारद माऊली महाराज भांबरगे यांनी केली. किर्तन यजमान नंदलाल आटोळे व सकाळचे अन्नदाते भानुदास भुतेकर व सायंकाळचे अन्नदाते सुभाष शेजुळ होते.किर्तनानंतर रंगले चक्री भजन भजन सम्राट पांडुरंग महाराज गोळेगावकर यांनी अभंग, अस्सल गवळणी भारूडे सादर करून दिवंगत बंडूबूवा गोळेगावकर यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Users Today : 160