मासरूळ:-विशेष प्रतिनिधी
स्थानिक शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित पदवी वितरण समारंभ २८ मार्च रोजी पडला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन जाधव तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, प्राचार्य डॉ. विजय नागरे, डॉ. पुरूषोत्तम वायळ, अविनाश मेहेरकर, प्रो. डॉ. सुनील मामलकर, डॉ. राजू गवई उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ. गजानन जाधव यांनी विद्यार्थ्यांनी भावी जीवनात आपल्या करियर सोबतच देशसेवा करावी, असे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे व उत्तरदायीत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रास्ताविक प्रा.डॉ. अरुण गवारे, सूत्रसंचलन प्रा.डॉ. चित्रा मोरे आभार प्रा. डॉ. अभय ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 160