सैलानी:-विशेष प्रतिनिधी
पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलाची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली आहे. त्यामुळे पिंपळगाव सराई येथील गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.नवनिर्वाचित पीएसआय गणेश राजेंद्र तरमळे यांची यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमधून पनवेल महानगरपालिका लिपिकपदी निवड झाली होती. नंतर पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याने एक महिन्यापूर्वी त्यांची सहाय्यक कर अधिकारी (मुंबई) येथे निवड झाली. मात्र, पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून त्यांची निवड झाली आहे. तरमळे यांचे कुटुंब अल्पभूधारक आहे. आई-वडिलांनी दिवसरात्र शेतामध्ये कामे करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तर मुलानेही सदर परिक्षा उत्तीर्ण करुन आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले.
Users Today : 160