नाल्यांच्या दुरुस्तीसह पाच दिवसाआड पाणीपुरवठा करा अन्यथा न.प. परिसरातच आंदोलन करु : शास्त्रीनगरवासीयांचा इशारा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

शहरातील प्रभाग क्रमांक ९, शास्त्री नगर मुठ्ठ ले-आऊट येथील सांडपाण्याच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे, यासह प्रभागाचा पाणी पुरवठा दर ४ ते ५ दिवसाआड करण्यात यावा, अशी मागणी शास्त्री नगरवासीयांनी केली आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास न.प. परिसरातच आंदोलन करु, असा इशारा सामाजीक कार्यकर्ते गणेश भोसले सह या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक ९ मधील नाल्यांची अवस्था खुप बिकट आहे. परिसरात नाल्या तुडूंब भरलेल्या असल्यामुळे रोगराई वाढली आहे. या ठिकाणी नवीन नाल्या बांधून घाण पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी, प्रभागामध्ये सध्या ८ ते १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी इतके दिवस पुरत नाही.त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागते, नाहीतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र, इतर प्रभागात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मग आमच्या प्रभागावर हा अन्याय का? मागण्यांचा सकारात्मक विचार करुन योग्य तो न्याय द्यावा. अन्यथा येत्या चार दिवसात न.प.परिसरातच आंदोलन करु, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले सह या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. निवेदन देताना गणेश भोसले, माया सुर्यवंशी, पूजा जाधव, रेखा सरसांडे, जयंती भोसले, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

0 9 5 4 3 4
Users Today : 160
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *