शेतकऱ्यांना फसविणाऱ्या ग्रीन गोल्ड कंपनीवर कारवाई करा विधानसभेत आ. श्वेताताई महाले आक्रमक

Khozmaster
2 Min Read

अमडापूर:-विशेष प्रतिनिधी 

अगोदरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. उत्पादन निघण्यासाठी केलेला खर्च व निघालेले उत्पन्न यामध्ये कुठलाही ताळमेळ लागत नसल्याने शेती करावी की सोडून द्यावी या भ्रमामध्ये शेतकरी जगत आहे. त्यात विविध कंपन्या शेतकऱ्यांना दाम दुपटीने बी वाटप करते. मात्र, सोयाबीन उत्पादन झाल्यानंतर मनमानी भावाने शेतकऱ्यांना पैशाची वाटप करते. त्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचे नंतर लक्षात येते. याबाबत कंपनीकडे दाद मागतली असतात कंपनी हात वर करून नियम अटी शिकवून रक्कम देण्यास नकार देते. अशा प्रकारे अमडापूर येथील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ग्रीन गोल्ड कंपनीवर कारवाई करा, अशी मागणी आ.श्वेताताई महाले यांनी विधानभेत केली. गोरगरिब शेतकऱ्यांची फसवणूक पाहत आ. महाले चांगल्याच आक्रमक होत्या. झाल्या अमडापूर येथील अनेक शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ मध्ये विविध कंपन्याकडून महागडे बी-बियाणे खरेदी केले होते. त्यानंतर उत्पादित केलेली सोयाबीन कंपनीने मोजमाप करून शेतकऱ्यांकडून पैसे न देता घेऊन गेले. मात्र, मालाचा पैशाचा चुकारा करताना शासनाच्या हमीभावाचा कोणताही विचार न करता कंपनीने मनमानी भावाने शेतकऱ्यांना पैसे वाटप केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या भावाने पैसा न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला होता. शेतकऱ्याने उर्वरित रक्क मेची मागणी कंपनीकडे केली असता कंपनी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आली. तसेच तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे शेतकऱ्यांना बोलल्यामुळे शेतकरी नाराज झाले होते. याबाबत श्याम जुमडे सह अनेक शेतकऱ्यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्याकडे आपले गाऱ्हाणे निवेदनाद्वारे मांडले. याबाबत निवेदनाची दखल घेत सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार श्वेताताई महाले यांनी श्याम जुमडेसह अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात प्रचंड आक्रमक झाल्या व मुजोर कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभेत प्रश्न मांडल्यामुळे अमडापूर येथील शेतकरी शाम जुमडे सह इतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता तरी कंपनीवर दबाव निर्माण होऊन कंपनी आपल्याला उर्वरित फरकाची रक्कम देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आमदार श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

0 9 5 4 3 4
Users Today : 160
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *