संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय तालुक्यात सर्वात मोठे अ वर्ग दर्जाचे असून विविध क्षेत्रातील शैक्षणीक, सामाजिक, धार्मिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षा, आरोग्य विभाग आदी ४० हजार पुस्तक आहेत. या सरस्वती वाचनालयाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.सरस्वती वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित या कवी संमेलनात परतवाडा येथील कवी गौतम गुळवे, कवी गजानन मते, मंगरुळपीरचे कवी प्रा. संजय कावरे, शेगावचे हास्य कवी प्रा. नितीन वरणकार, अकोल्याचे कवी गोपाल मापारी, प्रशांत भोंडे, परतवाडा येथील कवियत्री अलका तानलकर, मातृतिर्थ बुलडाणा येथील वैशाली तायडे यांची उपस्थिती राहणार आहे. सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजीत हास्य कवी संमेलन प्रसंगी पातुर्डा परिरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे.
Users Today : 160