शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नकुल रमेश शिंगणे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.उपसरपंच नकुल रमेश शिंगणे यांचा ठरलेला कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आज २८ मार्च रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच शोभाताई विठ्ठल शिंगणे यांच्याकडे सुपूर्द केला. नकुल शिंगणे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे पुढील उपसरपंच पदाकरता हालचालीला सुरुवात झाली आहे. पुढील उपसरपंच कोण होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 160