लोणार:-तालुका प्रतिनिधी
लोणार पासून अवघ्या तिन किमि अंतरावर असलेल्या किन्ही गावामध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने युवकामध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी लोणार पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देवून गावात सुरू असलेली अवैध दारू त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी करून दारूबंदी न झाल्यास ३१ मार्चपासून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. किन्ही गावामध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने गावातील युवक, प्रौढ व्यक्ती दारूच्या व्यसनाधिन झाले असून गावामध्ये कुंटुबात भांडणे वाढली आहेत. यामुळे गावकऱ्यांनी २७ मार्च रोजी लोणार पोलीस स्टेशन गाठून गावातील अवैधरित्या विक्री होत असलेली दारू त्वरित बंद करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन दिले. तसेच ३१ मार्च पर्यंत दारू बंदी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला. निवेदन देताना गावातील बहुसंख्य महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Users Today : 180