बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
आयडिअल क्लासेसने १६ वर्ष अखंडीत निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुध्दा नेत्रदिपक यश मिळवले आहे. यावर्षीच्या परीक्षेत आठ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहे. यामध्ये जिल्ह्यातून आयडिअल क्लासेसचे तीन विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आले आहेत.गुणवंत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम अर्नेशा अनंत लव्हाळे, व्दितीय प्रारंभ विशाल भुडके, तृतीय श्रीअंश गजानन गायकवाड यांचा समावेश आहे. जवाहर नवोदय समिती (जेएनएस) ने २५ मार्च २०२५ रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२५ चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही गैर- मौखिक परीक्षा असून, ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.या परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी प्रवेश दिला जातो. आयडीअल क्लासेसचे विद्यार्थी अर्नेशा अनंत लव्हाळे, प्रारंभ विशाल भुडके, श्रीअंश गजानन गायकवाड, श्रीजित रामेश्वर शेळके, अनय दिनकर डाबेराव, अनुज दिनकर डाबेराव, स्पंदन वसंत भोपळे, कौस्तुभ हर्षानंद खोब्रागडे यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेत जाऊन सुध्दा फक्त दोन तास वेळ दिल्यानंतर नवोदय परिक्षेत यश मिळू शकते हे आयडीअल क्लासेसने सिध्द करून दाखवले आहे. नवोदय निकालासाठी बुलढाण्याचा आयडियल क्लासेस हा एक पॅटर्न ठरल्याचे पुन्हा दिसून आले आहे. समाज हिताच्या दृष्टीने सुध्दा आयडीअल क्लासेस हे नेहमीच अग्रेसर राहिला आहे. दिव्यांग, विधवा महिलांचे पाल्य व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना या क्लासेसमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. या यशासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक सुनिल वाघ, शिक्षक दंदाले आदींनी मार्गदर्शन केले.
Users Today : 180