शिवाजी महाविद्यालयात पाणी परीक्षण कार्यशाळा

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी 

येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागा अंतर्गत पाणी गुणवत्ता परीक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना पाणी परीक्षणाचे महत्व आणि त्याचे तंत्रज्ञान शिकवणे होता.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. गजानन जाधव, अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. सुनील मामलकर तर प्रमुख उपस्थितीत प्रा. अविनाश मेहेरकर, प्रा. नंदा मास्कर, प्रा. पुरुषोत्तम चाटे, डॉ. प्रवीण ठेंग हे होते. डॉ. मामलकर यांनी पाणी बचतीचे महत्व आणि पाणी शुद्धतेच्या प्रक्रियांची माहिती दिली. पाणी परीक्षण कार्यशाळेचे समन्वयक प्रा. भास्करराव भिसे यांनी पाण्याच्या पीएच (सामू) किती असावा व अल्कली, तटस्थ व अल्कलाईन पाण्याचे महत्त्व सांगीतले. तसेच पाणी गुणवत्ता परीक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा वापर, पाण्याच्या विविध प्रकारांची तपासणी कशी करावी आणि पाणी शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांनाप्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी आणलेल्या पाण्याच्या नमुन्यांचे पीएच व टिडीएस तपासणी करून दिली तसेच, पाणी प्रदूषण आणि जलस्रोतांच्या संरक्षणावरही विचारमंथन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. नागेश गङ्कवार तर आभार प्रा. मनगटे यांनी मानले दिली.तसेच समन्वयक प्रा. निलेश रहाटे यांनी टिडीएस बद्दल माहिती दिली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पाणी नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्याची

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *