संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
बुलडाणा जिल्हा नुटा संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवडणुक जिजामाता महाविद्यालय (बुलढाणा) येथील सभागृहात अविरोध पार – पडली. बुलडाणा जिल्हा नुटा संघटनेच्या अध्यक्षपदी जिजामाता महाविद्यालय (बुलढाणा) येथील प्रा.डॉ. सुबोध चिचोले, उपाध्यक्षपदी शिवाजी महाविद्यालय (चिखली) – येथील प्रा.डॉ.विजयश्री हेमके.सचिव व सहसचिव म्हणून अनुक्रमे प्रा.डॉ.गोकुळ काळे (खामगाव), प्रा.डॉ.जी.एम. डोंगरे (चिखली), कार्यकारणी सदस्य म्हणून अनुक्रमे प्राचार्य डॉ. वाय.पी. पाटील (मलकापूर), प्रा.डॉ. दिपक नागरिक (खामगाव), प्रा डॉ. आर.एस. कोरडे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक कार्यकारी अध्यक्ष म्हणून नुटा संघटनेचे जेष्ठ सदस्य प्राचार्य डॉ.ए.एम.गारोडे तर निवडणूक निरीक्षक म्हणन प्रा.डॉ.प्रविण रघुवंशी, प्रा.डॉ. रविन्द्र मुंद्रे, प्रा.डॉ. सुभाष गावंडे तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. सनील मामलकर. उपाध्यक्ष प्रा.डॉ. कैलास पवार हे उपस्थित होते.निवडणकीसाठी प्राचार्य डॉ. वनिता पोच्छी, प्राचार्य डॉ.वाय.पी.पाटील, प्राचार्य डॉ. जमाईवार. प्रा.डॉ.डी.बी.बोबडे. प्रा.डॉ. मधुकर वानखेडे, प्रा.डॉ. कोलते, प्रा.डॉ. सुभाष गुर्जर, प्रा.डॉ. गजानन पैकट, प्रा.डॉ. वंदना काकडे, प्रा. महाजन, प्रा.डॉ. नामदेवराव ढाले, प्रा.डॉ. गणेश मालटे, यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. सुनील मामलकर, प्रा.डॉ.प्रविण रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जे.जे. जाधव तर आभार प्रा.डॉ. गणेश मालटे यांनी मानले.
Users Today : 180