मुंबई सीमा शुल्क विभागाचे संयुक्त आयुक्तपदी योगेश चित्ते

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

युपीएससी परीक्षेद्वारे निवड झालेल्या, आआरएस सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स, २०१५ च्या बॅचचे मौजे देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू येथील सुपुत्र योगेश चित्ते यांना मुंबई सीमाशुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. योगेश चित्ते यांना अथक परिश्रमाने, प्रामाणिक सेवाभावी वृत्तीमुळे या मानाच्या पदापर्यंत पोहोचवले आहे. सीमाशुल्क क्षेत्रातील त्यांच्या निर्भीड निर्णयक्षमतेने आणि पारदर्शक कारभाराने प्रशासनाला अधिक सक्षम आणि न्याय्य बनवले आहे. राष्ट्रसेवेसाठी त्यांची असलेली निस्वार्थ तळमळ आणि प्रामाणिकतेमुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या गौरवात भर पडली आहे.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *