राज्य कृषि पणन मंडळाच्या सदस्यपदी संजय काजळे यांच्या नियुक्तीस मान्यता

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३९ (ब) नुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर सदस्य म्हणून अमरावती महसूली विभागातून मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सदाशिव काजळे यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यास २६ मार्च रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ३९ (ब) मध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर राज्यातील बाजार समित्यांच्या सभापती मधून प्रत्येक महसूल विभागातून एक सदस्य या प्रमाणे ६ सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने अमरावती महसूली विभागातून कृषि उत्पन्न बाजार समिती, मलकापूरचे सभापती संजय सदाशिव काजळे यांची महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दरम्यान, संजय काजळे यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार संजय सदाशिव काजळे हे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळावर सदस्य म्हणून कामकाज पाहण्यास पात्र ठरले आहेत.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *