रेयान्श अंबल्डीगेने मिळवले सुवर्णपदक

Khozmaster
1 Min Read

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी

इंटरनॅशनल कॉम्प्युटर सायन्स ऑलिंपियाड २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक तुळशीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन नांदुरा येथील इयत्ता २ रीचा विद्यार्थी रेयान्श संदीप अंबलडीगे याने विभाग स्तरावर सोळावा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अठरावा क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
रेयान्शने ४० पैकी ३६ गुण प्राप्त केले असून एकूण ९५.६४ टक्के सरासरी आहे. नुकताच शाळेच्या वतीने त्याचा २५ मार्चला संस्थेच्या अध्यक्ष मीना झांबड, धानोरा येथील सरपंच उद्धव मनस्कार व मुख्याध्यापक डॉ. हितेंद्र चौबे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. समाज कल्याण विभाग बुलढाणा येथून सेवानिवृत्त झालेले पि.डी. सरदार यांचा रेयांश नातू आहे.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *