नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष प्रा.अॅड.व्ही.के. क्षीरसागर यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त २९ मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचशील सार्वजनिक बौद्ध विकास मंडळ, बुलढाणा तर्फे आयोजित या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे राहणार असून यावेळी के. ओ. बावस्कर, एच. एन.मोरे, पी.आर. इंगळे, जे.पी. वाकोडे व करुणानंद तायडे हे संबोधित करणार स्थानिक पंचशील भीमनगर येथे सकाळी आहेत. विहार ९.३० वाजता होणाऱ्या या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष एन. आर. वानखडे, सचिव संजय इंगळे यांनी केले आहे.
Users Today : 180