३ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई यांचेकडून प्रत्येक जिल्हास्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२५ करिता निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने जिल्हातील निवडणूक ३ एप्रिल २०२५ रोजी लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.वी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील संबंधित मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये वैद्यकीय  अधिकारी तसेच खासगी डॉक्टर्स हे मतदार असणार आहेत. बुलडाणा जिल्हयात एकूण २३११ मतदार आहेत. प्रत्येक मतदारास एकूण ९ (नऊ) मते देण्याचा अधिकार आहे. तसेच सदर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या लक्षात घेवून एकूण ५ मतदान केंद्र लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.बी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे ठेवण्यात आलेले आहेत. मतदान गुप्त पध्दतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतूदीनुसार होईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *