रायपूर येथे भंगाराच्या दुकानाला आग; साहित्य खाक

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

तालुक्यातील रायपूर येथे भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
रायपूर येथील शेख सादिक शेख कुरेशी यांच्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत साठवून ठेवलेल्या भंगाराच्या सामानाला अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक भंगार, टिनपत्रे इत्यादी साहित्य जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी तत्काळ बुलढाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना याबाबत कळवले.त्यानंतर बुलढाणा आणि चिखली पालिका अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली. वेळेत नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला, कारण आगीच्या परिसरात घरांची वस्ती असून, जवळच पेट्रोलपंपही आहे. या घटनेत शेख सादिक यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानीय नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोअर सुरू करून पाणी टाक आग विझविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *