खामगाव:-तालुका प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेला हरताळ फासल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत हद्दीत घंटागाडीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून घंटागाडी येत नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे दुर्गंधी पसरली असून, डास, माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.आरोग्य धोक्यात ! तक्रार करूनही ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीत आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या निष्क्रीयतेमुळे ‘स्वच्छ भारत मिशन’चा गाडा खामगाव ग्रामीणमध्ये रुतला असल्याचे दिसून येते.
Users Today : 180