दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा पंचायत समितीची आमसभा आणि सरपंच मेळावा २९ मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालयात आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील ७६ गावात ८२ कोटी रू खर्च करून अद्यापपर्यंत तालुक्यातील ह्या गावांच्या योजना पूर्ण न झाल्याने यातील बहुसंख्य गावे तहानलेली आहेत. सदर ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षात मुदतीत अद्यापपर्यंत एकाही गावची योजना पूर्ण केली नाही त्यामुळे या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आमदार महोदयांना प्राप्त झाल्या त्यामुळे आमदार मनोज कायंदे यांनी पाणीपुरवठा अभियंता गिरीश मालोकार यांना यावेळी धारेवर धरत या योजना मुदतीत अद्यापपर्यंत का पूर्ण झाल्या नाहीत ? असा सवाल करीत तात्काळ जलजीवन योजनेच्या चौकशीच्या सूचना देत यात जे ठेकेदार व अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.त्याचबरोबर घरकुल योजना देताना तालूक्यात ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर आहेत अशांना घरकुल दिले आणि जे खरोखर यासाठी पात्र आहेत त्यांना डावलले याबद्दल संताप व्यक्त करून सबंधित दोषी ग्रामसेवक आणि सरपंचावर कठोर कारवाई करा अशा सूचना आमदार कायंदेनी दिल्या त्यामुळे जलजीवन आणि घरकुल योजनेवर ही आमसभा चांगलीच गाजली.या आमसभेला गट विकास अधिकारी अंकुश म्हस्के, तहसीलदार अजित दिवटे, सहाय्यक गटविकास अधिकारी नीता महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी माजी, नगराध्यक्ष देविदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे, मुख्याधिकारी बोबडे श्याम भाऊ जाधव, इरफान अली, कचरूजी भारस्कर, युवराज नागरे, विठ्ठलराव इलग सरपंच संघटनेचे अध्यक्ष, भगवान पालवे, रामकिसन नागरे, प्रकाश मुंडे, गजानन मुंडे, अशोक कायंदे सह इतर गावचे सरपंच यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सिंदखेडराजा आणि ग्रामपंचायत भोसा या हायटेक झाल्याबद्दल त्यांच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कृषी विभागाला बियाणाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्याची प्रसिद्धी करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप करण्याच्या सूचना आमदार मनोज कायंदे यांनी केल्या. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, यांच्या तक्रारी आल्या. त्या अधिकाऱ्यांना आमदार कायंदे यांनी समज दिला. यासह यासह विविध विभागाचां आढावा आमदार कायंदे यांनी घेऊन तळागाळातील ग्रामीण जनतेचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी आमसभेचे सूत्रसंचालन विनोद ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)
Users Today : 180