लोणार येथील आमसभा विविध विषयावर गाजली

Khozmaster
2 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

येथे श्री मंगल कार्यालयात २८ मार्च रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, हे होते प्रमुख उपस्थितीत सिंदखेड राजा मतदारसंघाचे आ. मनोज कायंदे हे होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीरामजी मापारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवानराव सानप, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव कोकाटे, डॉक्टर प्रदीप मोरे, कारभारी सानप, संजय आटोळे, उभाठा सेनेचे आशिष रहाटे, जिल्हा संघटक गोपाल बच्चीरे, सदानंद तेजनकर, गजानन जाधव, सुदन अंभोरे, महेंद्र पनाड, कैलास अंभोरे, बुधवत महिला आघाडी च्या वाघ मॅडम तारामती जायभाये यांच्यासह इतर पदाधिकारी व्यासपीठावर हजर होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सहायक गटविकास अधिकारी शरद घुगे, तहसीलदार भूषण पाटील, लोणार ठाणेदार निमिश मेहेत्रे, गटशिक्षण अधिकारी जंगलसिंह राठोड, प्रशासकीय अधिकारी रवींद्र मापारी, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विभा वराडे, यावेळी लोणार तालुक्याच्या विकास कामावर चर्चा झाली. अंगणवाडी निकृष्ट बांधकामा बाबत चौकशीचे आदेश दिले. गावातील पाणीटंचाई, रस्त्याची दुरावस्था यावर चर्चा करण्यात आली. तसेच गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश आमदार मनोज कायदे यांनी तहसीलदार यांना दिले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व गावातील विकास कामे काळजीपूर्वक काम करण्यात यावे असे यावेळी आमदार खरात यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. याआमसभेला विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी व तालुक्यातील सरपंच व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. (ता.प्र.)

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *