‘मराठा जोडो अभियान’ रथयात्रा आगमन नियोजनासाठी बैठक

Khozmaster
2 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

मराठा सेवा संघ संचालित ‘मराठा जोड़ों अभियान जिजाऊ रथयात्रा २०२५ चे ‘मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात २० एप्रिल रोजी आगमन होत आहे. रथयात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी २८ मार्च रोजी हॉटेल तुळजाई टॉवर टेरेस लॉन खामगांव येथे नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी रथयात्रेचे जिल्हा समन्वयक इंजि. रविकांत काळवाघे प्रमुख उपस्थिती डॉ मनोहर तुपकर राज्य सहसचिव मराठा सेवा संघ, शिवमती सिमाताई ठाकरे जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, अनिताताई तनपुरे जिल्हाध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी, अंजलीताई देशमुख अध्यक्षा देशमुख महिला मंडळ, गिरीश देशमुख युवक मंडळ, किशोर आप्पा भोसले समन्वयक सकल मराठा समाज सभेला प्रमुख मार्गदर्शक सुभाषराव कोल्हे, प्रमुख उपस्थिती रविन्द्र चेके, योगेश पाटील प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड, प्रकाश टिकार माजी जिल्हाध्यक्ष, तुषार टिकार, अमर पाटील जिलाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,निलेश देशमुख सरपंच सुटाळा खुर्द हे होते, सर्वप्रथम सुभाष राव कोल्हे यांनी प्रास्ताविकातून जिजाऊ रथयात्रेचे नियोजन मराठा सेवा संघाने ‘का व कशासाठी केले. यासह रथयात्रेचे ध्येय व उद्दिष्ट्ये सांगितले जिजाऊ रथयात्रेची खामगांव नगरीतुन मार्गक्रमणाची दिशा व कॉर्नर सभेचे स्थळ निश्चित करण्यात आले. याप्रसंगी एम पी एस सी परिक्षेत नगर अभियंता पाणीपुरवठा विभाग न. प. जळगाव जामोद या पदावर नियुक्ति झाल्याबाबत इंजी श्वेता राजेश मुळीक हिचा सत्कार करण्यात आला.जिजाऊ रथयात्रेचे खामगांव समन्वयक म्हणून किशोर अप्पा भोसले यांची निवड करण्यात आली. सभेला, रंजनाताई घिवे इंजी कोमलताई तायडे, सुधा ताईभिसे, निश्चल इंगळे, प्रतिमा देशमुख, कल्पना अवचार, राधिका सोनोने, मोहीनी चेके, संगिता वाघ, शितल दारमोडे, राजु मुळीक, संजय विखे, राज देशमुख, संजय धोरण, सचिन कापले, चेतन धुमाळ, सुनील भुसारे, विनोद उबरहंडे, गणेश मामनकार, ओम कापडे, गोपाल देशमुख, श्रेयस गायकवाड, नितीन शेळके, अरुण मिरगे, शिवमती रक्षा पाटिल, शिल्पा ढगे, संगिता खरचणे, संजय ससाणे, अतुल खारोडे पाटिल, संतोष वाकोडे पाटिल, रविन्द्र बोंद्रे, सिध्देश्वर दाणे ई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचलन सुनिल खरात शहराध्यक्ष मराठा सेवा संघ तर आभार प्रदर्शन संजय धोरण यानी केले.

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *