बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा २० २५ च्या अध्यक्षपदी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांची एकमताने निवड झाली. येत्या १४ मे रोजी जयंती उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.१९९९ म्हणजे गत २६ वर्षापासून बुलढाणा शहरात धर्मवीर संभाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती धर्मवीर लोकउपाधी मिळालेले संजय गायकवाड यांच्या माध्यमातून सार्वत्रिक स्वरूपात साजरी केली जाते. एवढ्या भव्यदिव्य प्रमाणावर महाराष्ट्रात साजरी होणारी ही शंभुराजांची पहिली जयंती. त्याचा आरंभ छावा संघटनेच्या माध्यमातून संजुभाऊ गायकवाड यांनी केला होता. आताही जयंती भारतात लक्षवेधी ठरत आहे.धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाचा शेवट आज शनिवार २९ मार्च रोजी बुलढाणा जयस्तंभ चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात अभिवादन करून करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला आ. संजुभाऊ गायकवाड, महाराष्ट्र युवासेनेचे सरचिटणीस मृत्युंजय गायकवाड, धर्मवीर युथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, माजी नगर अध्यक्ष सौ. पुजाताई गायकवाड, आशिष जाधव यांचेहस्ते माल्यार्पण करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना नेते गणेशसिंह राजपूत, डॉ. राहुल मेहत्रे, किसान सेनेचे संदीप गायकवाड, प्रा. अनिल रिंढे, वाहतूक सेनेचे राजेश मुंगळे, डॉ. दिनेश अग्रवाल, केवलसिंग ठाकूर, गजानन लांडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अमोल वानखेडे यांनी केले. (जि.प्र.) महाराजांच्या संघर्षापासूनच प्रेरणा- आ.गायकवाड छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी पराक्रम गाजवताना त्यांचा प्रचंड छळही झाला, त्यावेळी त्यांनी केलेला संघर्ष हीच आपल्या आयुष्यातील प्रेरणा असल्याचे आ. संजूभाऊ गायकवाड यांनी सांगून छावा संघटनेच्या काळात तात्कालीन आमदाराने आपला प्रचंड छळ केल्याची खदखद त्यावेळी यावेळी त्यांनी व्यक्त केली. महाराजांच्या संघर्षांचा इतिहास समोर असल्याने त्यांना आपण पुरून उरलो, आज ते कुठेच नाही. त्यांनी विरोध केला प्रत्येक बाबतीत. विविध महापुरुषांची स्मारके साकारतानाही त्यांचा विरोध होता, परंतु हा सर्व विरोध पत्करून आपण महापुरुषांचे स्मारके साकारून आज ती प्रेरणा देत असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगून येत्या १४ मे रोजी होणारी शंभूराजांची जयंती ही मागील सर्व जयंतीचा रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढी प्रास्ताविक मृत्युंजय गायकवाड यांनी केले.
Users Today : 196