शुकदास माऊली समाधी मंदिर मानवतेचे प्रतीक-प्रजननदा महाराज

Khozmaster
2 Min Read

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी 

संपूर्ण जगताला मानवतेचा संदेश देणारे संत खरोखर धन्य होते. युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांनी तर मी अशा धर्मात जन्माला आलो आहे जो धर्म सर्वांना मानवतेचा संदेश देतो, असे विचार अमेरिकेतील शिकागो सर्वधर्म परिषदेमध्ये व्यक्त केले. भगवान श्री राम कृष्ण परमहंस यांचा दिव्य संदेश स्वामी विवेकानंदांच्या द्वारा जगाला पोहोचला. ज्यामध्ये अखंड निर्मळ असे सत्य होते. अगदी तोच विचार सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांनी उजाड माळरानावर विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातन निर्माण केलेल्या नंदनवनद्वारे व वयाच्या चौदाव्या वर्षी अनुभूती नावाचा महान तत्त्वदर्शक ग्रंथ निर्माण करून कैवल्याचा आनंद सर्वांना दिला. असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे क्रांतिकारी शिव-शंभु चरित्रकार, रामायण-भागवताचार्य, क्षात्र जगदुरु, धर्मभूषण गजाननदादा शास्त्री महाराज यांनी सच्चिदानंद सदुरू स्वामी शुकदास माऊली यांच्या समाधी मंदिराबद्दल बोलताना केले. स्वामी शुकदास माऊली यांचेजवळ जो जो कोणी जात होता तो अगदी प्रसन्न होऊनच बाहेर पडायचा. सर्वांशी हसत मुखाने बोलणे, सर्वांवर ममतेने प्रेम करणे, सर्वांच्या जीवन उद्धाराचा विचार करणे, संकटकाळी मदतीला धावून जाणे, अखंड निर्मळ वैराग्य वृत्ती धारण करणे, गरीब, अनाथ, दिव्यांग, पीडित, रोगी या सर्वांवर सेवेद्वारा कृपा करून मानवत्वाचा संदेश देणे हे अद्वितीय दिव्य कार्य स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या संपूर्ण जीवनभर केले. आजही ती प्रेरक शक्ती, ती अखंड ऊर्जा, स्वामी शुकदास माऊलींच्या समाधी मंदिराजवळ गेल्यानंतर जाणवते.सच्चिदानंद सदुरू स्वामी शुकदास माऊलींचा समाधी मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या आनंदाने विवेकानंद आश्रमात रामनवमीच्या मंगल पर्वावर संपन्न होत आहे. श्री श्री १००८ हरि चैतन्य स्वामी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न होणार आहे. शेवटच्या दिवशी रामनवमीला महाप्रसादाचेही आयोजन आहे. तेव्हा सर्वांनी आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *