मेरा बु:-विशेष प्रतिनिधी
चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांचे माहेर असलेल्या मेरा बु. गावा मध्ये जावून मुस्लिम समाज बांधवांसोबत इप्तार पार्टी साजरी केली. तर दुसरीकडे मेरा खुर्द येथे इप्तार पार्टीसाठी दिग्गजांची मांदियाळी अवतरली. रमजान महिन्यात मुस्लिम समाज बांधव महिनाभर ( रोजा) उपवास करतात. रमजान पवित्र महिना असल्याने गावातील प्रतिष्ठित लोक इफ्तार पार्टीचे आयोजन करून फराळाचे वाटप करतात. आणि सर्वजणं एकत्र येऊन शांतता, सौहार्द आणि परस्पर बंधुभावाचा संदेश दिला जातो. त्यामुळे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपले माहेर असलेल्या मेरा बु गावातील मुस्लिम बांधवासोबत इप्तार पार्टी साजरी करुन चिमुकल्यांनी आमदार ताईचा केक कापून वाढदिवस साजरा केला. सर्व जाती धर्माचा एकोपा पाहुन सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे मेरा खुर्द येथे मुस्लिम समाज बांधवांची संख्या ८० टक्के असल्याने इप्तार पार्टी साठी बाहेर गावावरून मोठ्या दिग्गजांची मांदियाळी अवतरली. अशी आगळी वेगळी वं अनोखी इप्तार पार्टीला सर्व जाती धर्माच्या लोकांची हजेरी दिसून आल्याने दोन्ही गावात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायाला मिळाले.यावेळी मेरा बु गावातील माजी सरपंच सुनिल पडघान, ग्रा. प. सदस्य गजानन वायाळ, अंकुशराव पाटील, सरपंच रमेश अवचार, उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, दत्तू पाटील, सो. सा. अध्यक्ष भास्कर पडघान, राजेंद्र पाटील, राजु पाटील, राधेश्याम पाटील, दतात्र्य पडघान, पुरुषोत्तम पडघान, भरत पडघान, लक्ष्मण पडघान, निखिल पाटील, विनोद पडघान, कैलास पडघान, मोहन पडघान, सागर पडघान, सांडू शहा,, जफर शाह. इरफान शाह. नाईम शाह. शाहरुख शाह, मुबारक शहा, युसूब तांबोळी, बाजीराव डोंगरदिवे, अफजल शहा, र मेरा खुर्द येथे आ. कायंदे तर यांचे सासरे सुभाष दराडे, फारुख देशमुखसुभाष देव्हडे, राम खेडेकर, अलियार सर, रफिक सर, नदीम देशमुख, बाबर देशमुख, भिका खेडेकर, दिपक शिंगणे डॉ सोहिल पंठरी गावंडे, रामदास पडघान, डॉ मुझहिद, जरीफ देशमुख, फझल देशमुख, राशीद खान, अफरोज सुभान, नदीम सर, सहीद सर ठाणेदार शक्करगे, जारवाल, देढे, लेंडे सर, प्रभू काळे, आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
Users Today : 195