विवेकानंद नगरीत उद्यापासून हभप ढोक महाराजांचीश्रीराम कथा

Khozmaster
2 Min Read

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी 

मानवसेवेचे केंद्र ठरलेल्या विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संतपू. शुकदास महाराज समाधी मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याचे रामनवमीदिनी अर्थात ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य अशा श्रीराम कथा पारायणाचे ३० मार्च पासून ५ एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. समाधी मंदीर कलशारोहणाचा सोहळा ब्रम्हवृंदाच्या पुरोहित्यात व परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी हरिचैतन्य महाराज यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे.विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज हे २०१७ ला समाधीस्त झाले. त्याच जागेवर त्यांच्या समाधीस्मारक मंदिराचे बांधकाम करण्यात आले. येत्या श्रीरामनवमीला त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याठिकाणी केल्या जाणार आहे. ‘ईश्वराचाशोथ व्यर्थ का करिता प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे’ असे म्हणणारे महाराज हे माणसातील ईश्वराचे पूजक होते. जीवनभर त्यांनी माणसातील देवाची पूजा केली.सुप्रसिध्द रामकथाकार रामरावजी महाराज ढोक हे ३० मार्च ते ५ एप्रिल सायंकाळी ७ ते १० या वेळेत कथा करणार आहेत. कथेसाठी पंधरा हजार चौरस फुटाचा भव्य मंडप टाकण्यात आला आहे. या आठवड्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेवून कथेची वेळ सायंकाळची ठेवली आहे. कथेसाठी परिसरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता, पोलिस प्रशासन, एसटी महामंडळ यांना पत्र देण्यात आलेली आहेत. वाहनांची पार्किंग, पिण्याचे पाणी, भाविकांची निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समाजाचे बौध्दिक व मानसिक भरण पोषण व्हावे, वर्तनशील सुज्ञ समाजनिर्मीती व्हावी, यासाठी याप्रकारच्या कथात्मक प्रबोधनाची गरज आहे.प. पू. शुकदास महाराजांच्या उत्सवानिमित्त संस्थेने आयोजित केलेल्या रामकथेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी येण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)

0 9 5 4 6 9
Users Today : 195
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *