चांडोळ:-तालुका प्रतिनिधी
बुलढाणा येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. जे. बी. राजपुत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २५ मार्चला मगरीबच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवासाठी चांडोळ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. सायंकाळी मगरीब नमाजच्या नंतर रोजा सोडला जातो, त्यास इफ्तारी असे म्हणतात. रमजान महिन्यात शेवटी ५ ते ६ दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. डॉ. जे. बी. राजपूत यांच्या वतीने होळी मैदानातील जामा मस्जिदमध्ये देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. जामा मस्जिदचे इमान मौलाना मुबीन यांनी मगरीबची नमाज पठण केल्यानंतर इफ्तार पार्टीला सुरुवात झाली. यावेळी चांडोळ येथील सुरेश धनावत, रतन धनावत, नसरुल्ला पठाण, शफी मौलांना, हफिज पठाण, मो. शाहेद, शे. अयाजशेठ, वाहेद बेग, इसाक सेठ, फईम पठाण, शफिक, शे. रकीम, मनियार, अनिस, जुनेद, मो. ईस्माईल अकील, डॉ अज्जू, मो. याकुब, मोहमंद मुश्ताक, पत्रकार शेख नदीम यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
Users Today : 196