सोनाळा:-विशेष प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील ५९ गावे बाहेर निघाली असतांनाही येथे मनरेगामध्ये वैयक्तिक सिंचन विहिर खोदण्यास मनाई प्रतिबंध ‘जैसे थे’ आहे. सामुहिक सातबारा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुसाट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सिंचनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे मानगुटीवर डार्क झोनचा काळा नियम कायम बसलेला आहे. त्यामुळेच रुपये ४ लक्ष अनुदानाची मनरेगा सिंचन विहिर खोदण्यासाठी शासनाची मंजूरी मिळत नसल्याचे उघड झाले आहे. मात्र येथील सामुहिक सातबारा असलेल्या शेतीसाठी डार्क झोन ची अट नसत्याने सिंचन विहिरी खोदण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. शासनाच्या विरोधाभास असलेल्या निर्णयामुळे शेतकरी पार चक्राऊन गेले आहेत.या तालुक्यात जेमतेम ३० टक्के बागायती शेती आहे. मात्र अपूरा जलस्त्रोत असत्याने बारमाही पिका खाली बागायत जमिन नाही असे असतांना भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी भुजल मुल्यांकन २०२२ नुसार संग्रामपूर तालुका हा अतिशोषीत वर्गवारीत समविष्ठ केला होता. मोठा पाणी उपसाहोत असल्याने पाणी पातळी खोल गेली आहे. असे वॉटर ऑडीट केले होते. परिणामी शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यास व कृषी योजनेचा शासकीय लाभघेण्यापासून बाद ठरविले होते. आता मात्र ९९ पैकी ५९ पानलोट वगाव हे सुरक्षित पातलोट क्षेत्र असल्याचे अहवालात नमूद आहे. विहिरी खोदण्यासाठी शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरक्षित वर्गवारीतील गावांची नावे कागदावर आहेत. यात आस्वद, आवार, कोद्री, कुंदेगाव, पिप्री अडगाव, टाकळी पंच, उकळी बु., दुर्गादैत्य, जस्तगाव, खिरोडा, वरवट खंडेराव, अन्यार पानलोट, बल्लाळी, बानोदा बु, बानोदा एकलारा, बावनबीर, भूईखेड, बोरखेड, दानापूर छोटे, देऊळगाव, धर्माल, डोंगरखेड, काकनवाडा बु, काकनवाडा खू, कामोद पानलोट, काटेल, काथरमल, खळद बु, खळद खु. खेल भोंगळ पातुर्डा, खेल दलवी पातुर्डा, खेल माळी पातुर्डा, खेल थोरात पातुर्डा, कोलद, लिंगाई, मनार्डी, मोमीनाबाद, नेकनानपूर, पलसोळा, पातुर्डा खू, पिंप्री कवठळ, पिंगळी बु. पिंगळी जहाँ, रिंगणवाडी.रोहिणखिडकी, सोगोडा, सालबद, सालवन, संग्रामपूर प्रगणे सोनाळा, सावळी, सायखेड, सोनाळा, वडगाव वाण, वांगर, वानखेड, वारखेड, वरवट बकाल पानलोट व गावे सुरक्षित वर्गवारीत भुजल सर्वेक्षण विभागाने समाविष्ठ केले आहे. या अहवालानुसार अंमलबजावणी सुरु झाली नाही. त्यामूळे उपरोक्त गावातील शेतकरी विहिरीच्या लाभापासून वंचित आहेत. त्या उलट सामुहिक सातबारावर शेती असलेल्या संग्रामपूर तालुक्यात ५५ विहिरी मनरेगात अनुदानावर मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष १६, विहिरी खोदकाम सुरू आहे. यात दुर्गादैत्य १, एकलारा ४, चांगेफळ २, बोडखा ३, निरोड २, पलसोडा ३, झाशी २, बावनबीर ५, वरवट बकाल १, धामणगाव १, तामगाव २, वकाना ६. ६. पातुर्डा १, आकोली ४, पिप्री माळेगाव ६ इत्यादी सामुहिक विहिरी मंजूर आहेत. तर उमरा येथील ७विहीरी चे का सुरू झालेले नाही. मात्र याच भागात वैयक्तिक सिंचन विहिर खोदण्यासाठी प्रतिबंध कायम आहेत. (वि.प्र.)
Users Today : 196