शेगाव:-तालुका प्रतिनिधी
मारवाडी ब्राह्मण समाजातील महिलांना एकत्र आणून समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या समाज उपयोगी कार्य करणाऱ्या सौ. अनिता नरेंद्र शर्मा यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शेगाव शहरातील जोगडी फैल भागातील नरेंद्र शर्मा यांच्या निवासस्थानी हा सन्मान करण्यात आला. यावेळी सकल मारवाडी ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. गायत्री शर्मा, उपाध्यक्ष अंजू मिश्रा, अर्चना चौबे, विना शर्मा यांनी सौ. अनिता शर्मा यांचा शाल, श्रीफळ व विशेष सन्मानचिन्ह शील्ड देऊनत्यांचा गौरव केला. यावेळीशेगाव शहर मारवाडी ब्राह्मण महिला मंडळाच्या संस्थापिका सौ. अनिता नरेंद्र शर्मा होत्या. तसेच शेगाव शहर मारवाडी ब्राह्मण महिला मंडळाच्या शहराध्यक्षा सौ. शोभा राजेश चुलेट, सचिव सुनिता तिवारी, विप्र नारी मंडळ शेगाव शहराच्या अध्यक्ष राणी शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी सोनल कलावटे, सुनिता शर्मा, स्नेहा शर्मा, शीला तिवारी, उर्मिला तिवारी, संगीता राजपुरोहित, राखी सुनील शर्मा, किरण शर्मा, गौरी शर्मा, गीता शर्मा, मनीषा स्वामी, सोनल शर्मा, दिपाली शर्मा, माधुरी तिवारी, सुमित्रा शर्मा, राखी शर्मा, संगीता शर्मा, पीहु पुरोहित यांच्यासह मारवाडी ब्राह्मण समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सौ. अनिता शर्मा यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी समाजातील महिलांना एकत्र आणून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवले आहेत. गरजू आणि वंचित महिलांसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे समाजातील महिलांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे, असे गौरवोद्वार यावेळी काढण्यात आले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता तिवारी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ. शोभा राजेश चुलेट यांनी मानले. (श.प्र.)
Users Today : 196