घर फोडून लाखोचा ऐवज लंपास

Khozmaster
1 Min Read

लाखनवाडा:-विशेष प्रतिनिधी 

लाखनवाडा बु येथील अनिस खान हाशम खान वय ४० वर्षे व्यवसाय शेती यांच्या घरी २९ मार्च रोजी रात्री १ ते ३ या वेळेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करुन कपाटांमधील साहित्य, नगदी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पसार झाले. दोन लाख ९५ हजार एवढ्या रकमेची चोरी झाल्याची फिर्याद अनिस खान हाशाम खान यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली. चोरीमध्ये घरातील रोख रक्कम दोन लाख वीस हजार व सोन्याची किंमत अंदाजे रक्कम ५००००, ५ ग्रॅमचे पेंडल २५०००, अशी चोरी झालेला ऐवज चोरट्यांनी पळवला घटनेचे गांभीर्य घेऊन डी वाय एस पी खामगाव यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथकाला प्रचारण करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास चौधरी व बीट ए. एस. आय. आनंदा वाघमारे करत आहे. (वार्ताहर)

0 9 5 4 6 9
Users Today : 195
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *