ट्रॅक्टर न सांगितल्याने पुतण्याने केली काकाची हत्या

Khozmaster
2 Min Read

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी 

जुन्या वाद उकरून काढत तसेच खत वाहण्यासाठी माझे ट्रॅक्टर भाड्याने का सांगितले नाही म्हणत पुतण्याने कुऱ्हाडीचे वार करत सख्ख्या काकाचा खून केल्याची घटना २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील सोनज (इसवपूर) येथे घडली.गोपाल मनोहर बोके (४५) असे मृत काकाचे व शुभम विठ्ठल बोके (३०) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. गोपाल बोके व गणेश बोके हे दोघे भाऊ शेजारी राहतात. शुभम बोके हा दारूचा व्यसनी आहे. त्याच्याकडे ट्रॅक्टर असून, तो त्याद्वारे शेतीची कामे करतो. गोपाल बोके यांनी त्यांच्या शेतातील कामे अन्य दुसऱ्यांच्या ट्रॅक्टरद्वारे करवून घेतली होती. याचा राग शुभम बोकेच्या मनात होता. २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्याने काकाच्या घरासमोर जावून वाद घातला. माझे ट्रॅक्टर खत वाहण्यासाठी का सांगितले नाही म्हणत गोपाल यांच्या छाती व मानेवर कुऱ्हाडीने घाव घातले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून गोपाल बोके यांना मृत घोषित केले. मृताचा मुलगा विश्वजीत बोके याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक केली. घटनेच्या आदल्या दिवशी शिवीगाळ आरोपी शुभम हा जुन्या वादातून मृत गोपाल व त्यांच्या मुलास नेहमी मारझोड करायचा. त्रास द्यायचा. २८ मार्च २०२५ रोजीदेखील आरोपीने दारू पिवून घरासमोर शिवीगाळ केली होती. त्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपीने पूर्व वैमनस्यातून हत्या करत वचपा काढला. नंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. तुला खल्लासच करतो ! ‘गोपाल्या तु बाहेर निघ, तु शेतात खत वाहण्यासाठी ट्रॅक्टर का सांगितले नाही, तु श्रीमंत झाला का, तुला आज मी खल्लासच करतो’, अशा धमक्या देत आरोपीने धारदार कुऱ्हाडीने घाव घालून गोपाल बोके यांचा खून केला, असे मुलाने तक्रारीत नमूद केले.

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *