माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील काबरा हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. वंदनाताई काबरा यांनी रुग्णांची तपासणी केली. बाजार समिती क्षेत्रातील तसेच परिसरातील शेतकरी, गुरांचे व्यापारी, यार्डातील आडते, व्यापारी, हमाल व मापाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरासाठी बाजार समितीचे उसभापती दादाराव खार्डे व संचालकांनी परिश्रम घेतले. माजी संचालक अशोकराव शेळके, बबनराव डोके, सचिव किशोर म्हस्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

0 9 5 4 6 9
Users Today : 195
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *