आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक प्रकल्पात सहभाग पर्यावरण जनजागृतीसाठी राबविले विविध उपक्रम

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

बेल्जियम येथील कोयेन टीमर्स आणि जेनिफर विलियम्स यांच्या नेतृत्वाखालील ‘क्लायमेट अॅक्शन प्रोजेक्ट’ या जागतिक पर्यावरण जनजागृती प्रकल्पात आदर्श विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी आपला कृतीयुक्त सहभाग नोंदवला. सहा आठवडे चाललेल्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि हवामान बदलांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले.प्रकल्पाच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी पृथ्वीवर प्रदूषण पसरवणारे घटक आणि प्रदूषण का पसरते याविषयी वेगवेगळ्या माध्यमातून कारणे शोधून त्याचे प्रदर्शन केले. प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम, वृक्षारोपण यासारख्या विषयांवरही विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. यासोबतच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन सत्रांमध्ये विद्याथ्यांनी फ्रान्स आणि इटलीच्या मंत्र्यांसोबत संवाद साधला. जगाच्या नकाशावर आपल्या शाळेचे स्थान दर्शवण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली. यानंतर, एप्रिल महिन्यात हे विद्यार्थी मलेशिया, बेल्जियम आणि कोलंबिया येथील विद्यार्थ्यांशी गुगल मीटद्वारे संवाद साधणार आहेत. या प्रकल्पातील यशस्वी सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट अॅक्शन प्रोजेक्ट’ बेल्जियमतर्फे ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळाली. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश गव्हले आणि ग्रंथालय विभाग प्रमुख राधिका राजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मेंटर सुवर्णा कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला आणि संचालक मंडळाने मेंटर आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अनुजा बिडवे, नेहल चोपडे, अक्षदा ठाकूर, अक्षरा चेडे, ईश्वरी देशमुख, वृषाली पर्हाड, समृद्धी मेरेकर, अनिरुद्ध फोलाने, साई गाडेकर, सुदर्शन मस्के, यश सुरडकर, सोहम सुरडकर, भावेश गुंजाळकर, श्रावण टेंभरे, आराध्य जपे आणि सुजल मोळवणे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात उत्साहाने सहभाग घेतला.

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *