नागणगाव येथील वीज खांब बनला धोकादायक

Khozmaster
1 Min Read

पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी 

येथून जवळच असलेल्या नागणगाव येथील मुख्य गावठाण मधील रस्त्यावरील वीज पुरवठा करणारा गावातील वीजपोल धोकादायक बनला असून याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.सदर पोल हा अत्यंत खराब, कुजलेला असून एका बाजूने झुकलेला आहे. त्यामुळे सदर पोल दुरुस्ती करणे आवश्यक असताना महावितरणने याकडे गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. सदर पोल दुरूस्तीसाठी वेळोवेळी कनिष्ठ अभियंता यांना गावकऱ्यांनी विनंती करून सुद्दा दुरूस्त केला नाही. लवकरच वादळी वाऱ्यासह पावसाळा सुरू होणार असून सदर पोल हा त्या ठिकाणच्या घराजवळ कोसळून जीवितहानी होऊ शकते.त्यामुळे महावितरणने सदर पोल बदलणे आवश्यक आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सदर पोल तत्काळ बदलावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *