सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक आदराचे स्थान आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि अहोरात्र काम करण्याची जिद्द या स्वभावगुणामुळेच जनसामान्यांचे ते लोकनेते ठरले आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देत असल्याने कार्यकर्ते आणि जनतेशी जुळलेली त्यांची नाळ कदापि तुटणार नाही, असे घट्ट नाते सिंदखेड राजा मतदारसंघात त्यांनी निर्माण केले आहे. जनमाणसातील त्यांच्याबद्दल असलेले आदरयुक्त वेगळे स्थान सर्वच काही सांगून जाते.समाजकारण आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पंचवीस-तीस वर्षे राजकारणातील महत्त्व आजही अबाधित आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांची कारकीर्द ही तेव्हाच बहरते जेव्हा त्या नेत्यांच्या सामाजिक कार्याला पद आणि अधिकारांचा मुलामा चढतो. मात्र आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहचल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा वटवृक्ष बहरत असताना समाजाच्या तळागाळाशी त्या नेत्याची नाळ जोडलेली असणे गरजेचे असते. मूळाशी असलेले ऋणानुबंध नेत्यांची कारकीर्द घडवते आणि फुलवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आमचे साहेब, लोकनेते डॉ. राजेंद्र शिंगणे होय ! आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील साहेबांच्या विषयी असलेल्या भावना, मनोगत मी माझ्या स्वःहस्त लेखणीतून सादर करण्याचा प्रयत्न करतो. ऐन तारुण्यात बुलढाणा जिल्ह्यातील सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे म्हणजेच मोठे साहेब यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले आणि घटनेने जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारणात पोकळी निर्माण झाली. अशा कठीण परिस्थितीत पितृछत्र हरपल्यानंतरही आव्हानांच्या माथ्यावर पाय रोवून उभा राहणारा एक हिंमतवान माणूस म्हणजे डॉ. राजेंद्र शिंगणे होय. समाजाच्या हित आणि उन्नतीसाठी स्वतःला अंतर्बाह्य झोकून देऊन सर्वस्वाचा त्याग करणारा दयेचा सागर म्हणजेच डॉ. शिंगणे साहेब आहेत. तत्वनिष्ठ, एकनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि प्रचंड नम्रता असलेला हा असामान्य राजकारणी माणूस म्हणजेच डॉ. राजेंद्र शिंगणे होय.गोरगरीब आणि समाजाचे सुख हेच आपले सुख मानून अखेरच्या श्वासापर्यंत समाजाच्या विकासासाठी एकनिष्ठ राहण्याचे बळ आमच्या साहेबांमध्ये आले कुठून? स्वतःच्या कार्याविषयी गर्वाचा यत्किचितही लवलेश नसलेले एक व्यक्तिमत्त्व डॉ. राजेंद्र शिंगणे कोण आहेत, हे शब्द सुमनांनी सांगणे जमणार नाही. कारण शब्दांना ही कोडे पडावे असे साहेबांचे कार्य आहे. साहेबांची जीवन कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. निर्व्याजमनाने समाजाचे देणे देणारे साहेब आपण ‘मनासारखा राजा आणि राजा सारखं मन’ असलेला जनतेच्या मनातील लोकनेता राजामाणूस आहात. म्हणूनच आपल्या उपकारांची ऋण उतराई होण्याकरिता तुमच्या पाठीशी सदैव प्रयत्नशील राहू, यात तिळमात्र शंका नाही. तुमच्या कार्य कौशल्यामुळे विकासरुपी सिंचनाच्या तुषारांमध्ये सर्वांग भिजण्याचे भाग्य आम्हा जनतेला लाभले हे पाहून आम्ही धन्य झालो.साहेब, आपली कामगिरी विविधतेचा एक आदर्श मापदंड ठरत आहे व राजकीय क्षेत्राला पडलेले अद्भूत आणि अनाकलनीय स्वप्न आहात आपण. सर्व सामान्य माणसाच्या वेदना जाणणारा एक समाजकारणी माणूस म्हणजेच आमचे साहेब. समाजकारणाला केंद्र बिंदू ठरवून अप्रतिम राजकारण करणारे अप्रतिम राजकारणी म्हणजेच साहेब. कर्तृत्ववान, दूरदृष्टीचा राज्यकर्ता, शेतकरी आणि गोरगरीब जनता यांच्याबद्दल प्रचंड आस्था असणारा एक सामान्यातून असामान्य कामगिरी करणारे खरेखुरे लोकनेते म्हणजेच आमचे साहेब डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब. त्यांच्याविषयी दोन ओळी लिहिण्याचा अप्रतिम योग व भाग्य मिळाले यापेक्षा मोठा आनंद माझ्या जीवनात कुठलाच नाही. अशा सर्वसामान्य माणसांच्या प्रती प्रेमळ जिव्हाळा असलेल्या लोकनेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन !
Users Today : 196