बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
रायपूर येथील पेट्रोल पंपाच्या ५० फूट अंतरावर एका भंगार दुकानाला भीषण आग लागली. २८ मार्चला दुपारी ही घटना घडली.तालुक्यातील रायपूर येथील शेख कदीर शेख अफसर यांचे भंगार दुकान नदीकाठाच्या वरच्या बाजूने आहे. त्याच्या बाजूनेच भोंडे यांचा पेट्रोल पंप आहे. २८ मार्चच्या दुपारी आग लागली. यामध्ये भंगारासह दुकान जळून खाक झाले. यात ५० ते ६० हजारांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अग्नीशामक दलाने ही आग विझविली. वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
Users Today : 196