टाकळी सरपंचपदी संगीता मारोडकर बिनविरोध

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील टाकळी (वा) ग्रामपंचायत सरपंच अंजनाबाई साळोकार यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. २८ मार्च रोजी सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. एकमेव अर्ज आल्याने संगीता किशोर मारोडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.सरपंच अंजनाबाई साळोकार यांच्या राजीनाम्यानंतर २८ मार्च रोजी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम (१) तरतुदीनुसार नामाप्र स्त्री सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. दुपारी २ वाजता सभेस सुरुवात झाली.सरपंचपदासाठी संगिता मारोडकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची टाकळी सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुलाब शिराळ, तुळशीराम सपकाळ, अनिल बहादरे, प्रवीण शिवनेकर, अंजना साळोकार, नंदा सपकाळ, कुसुमबाई शिंबरे, सुषमा गवई उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विनोद डोईफोडे यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचीत सरपंच संगीता मारोडकर यांचा ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *