सिंदखेडराजा:-तालुका प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी चहा विकला. आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या जीवनात अपयश आले. पण, त्यांनीही यश मिळविलेच. संघर्षाच्या वाटेत यश संपादन करत यशस्वी झालेले अनेक उद्योगपती आहेत. शिक्षणात अपयश आले म्हणून खचून न जाता स्किल वापरून आयुष्याचे सोने करा. चुकीचा मार्ग निवडू नका, असे प्रतिपादन हभप विशाल खोले यांनी केले.सोमपुरी महाराजांच्या १५६ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या द्वितीय कीर्तनात ते बोलत होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे उपदेश करताना ते म्हणाले, स्वामींवर सत्ता गाजवायची असेल तर विश्वास ठेवावा लागेल. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांचा भरपूर छळ झाला. परंतु त्यांनी पांडुरंगावर म्हणजेच स्वामींवर विश्वास ठेवला होता. मुलांपेक्षा मुली घराचा स्वाभिमान आहे. मुली दोन घरांचे नाव उज्ज्वल करतात म्हणून महिलांना सन्मान द्या.यावेळी कीर्तनाला गायनसाथ संगीत अलंकार तुळशीराम दाभाडे, संगीत विशारद संतोष वाघ, गाण कोकिळा कैलास महाराज पवार व युवा मृदंग विशारद रोहन महाराज भिसे यांनी केली. कीर्तनाचे यजमान शिवाजी जायभाये सकाळचे अन्नदाते रामकिशन नागरे, शिवाजी दवने हे होते. यावेळी किर्तनाला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.भजनसम्राट तुळशीराम महाराज दाभाडे, संतोष महाराज वाघ, महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून परिचित कैलास पवार व मृदंग विशारद रोहन महाराज भिसे यांची आयोजित भजनसंध्यादरम्यान अभंग गवळणी भारूडे सादर झाली. संगीत विशारद संतोष महाराज वाघ यांनी नाकातून सनईचा स्वर काढला. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन आनंदाने माना डोलवत भजनचा आनंद घेतला.
Users Today : 206