हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज २०१७ ला समाधीस्त झाले. त्याच जागेवर त्यांच्या समाधीस्मारक मंदिराचे बांधकाम करण्यात आले. येत्या श्रीरामनवमीला त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याठिकाणी केल्या जाणार आहे. ‘ईश्वराचा शोध व्यर्थ का करीता प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे’ असे म्हणणारे महाराज हे माणसातील ईश्वराचे पूजक होते. जीवनभर त्यांनी माणसातील देवाची पूजा केली. दीन, दुःखी, पीडित, निराधारांचा विचार करून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ज्ञान, विज्ञान, आरोग्य, शिक्षण, सुविधा, कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम केले. या संपूर्ण उत्सवाची सुरुवात आजपासून श्रीरामकथेच्या आयोजनातून होत आहे.रामकथाकार रामरावजी महाराज ढोक हे ३० मार्च ते ५ एप्रिल सायंकाळी ७ ते १० या वेळेत कथा करणार आहेत. कथेसाठी पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. या आठवडयात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कथेची वेळ सायंकाळची ठेवली आहे. कथेसाठी परिसरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन, एसटी महामंडळास पत्र देण्यात आले आहेत. वाहन पार्किंग, पिण्याचे पाणी, भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजाचे बौद्धिक व मानसिक भरण पोषण व्हावे, वर्तनशिल सुज्ञ समाजनिर्मिती व्हावी यासाठी या प्रकारच्या कथात्मक प्रबोधनाची गरज आहे. शुकदास महाराजांच्या उत्सवानिमित्त संस्थेने आयोजित केलेल्या रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 206